नवसाक्षरता अभियान प्रक्रियेमधून प्राथमिक शिक्षकांना वगळावे – समन्वय समिती च्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन.
कोल्हापूर/प्रतिनिधी
नवसाक्षरता अभियान प्रक्रियेमधून प्राथमिक शिक्षकांना वगळावे अशा आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती च्या वतीने समन्वय समिती अध्यक्ष तथा कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन,समन्वय समिती सदस्य तथा शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर , समन्वय समिती सदस्य तथा शिक्षक महासंघ जिल्हाध्यक्ष सदानंद शिंदे यांच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होत असून,शैक्षणिक गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम होईल यासाठी शिक्षकांना शाळेत शिकवू द्या,अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांचे मूळ कर्तव्य बाजूला राहत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
या भेटी दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच बदलून आलेले अमोल येडगे यांचे समन्वय समिती व जिल्हाभरातील सर्व शिक्षकवर्गाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणेत आले.
यावेळी “नवसाक्षरता अभियानाच्या प्रक्रियेमध्ये प्राथमिक शिक्षकांना वगळावे,अशी आग्रही मागणी यावेळी निवेदनाद्वारे करणेत आली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी येडगे यांच्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष तथा कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन,समन्वय समिती सदस्य तथा शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर , समन्वय समिती सदस्य तथा शिक्षक महासंघ जिल्हाध्यक्ष सदानंद शिंदे उपस्थित होते.
(फोटो ओळी-जिल्हाधिकारी अमोल येडगे याना नवसाक्षरता अभियान प्रक्रियेमधून प्राथमिक शिक्षकांना वगळावे या आशयाचे निवेदन देताना समन्वय समिती चे अध्यक्ष गौतम वर्धन,प्रमोद तौंदकर,सदानंद शिंदे आदी.)










