March 24, 2026

सभासदांसाठी मयत सभासद कुटुंब कल्याण योजना- चेअरमन शिवाजी भोसले.

0
IMG-20240220-WA0009

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या सभासदांसाठी मयत सभासद कुटुंब कल्याण योजना-
चेअरमन शिवाजी भोसले.

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांच्या साठी मयत सभासद कुटुंब कल्याण योजना राबविण्यास सभासदांनी एकमुखी मान्यता दिल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी भोसले यांनी दिली .ते सभासदाच्या साठी आयोजित विशेष सभेत बोलत होते .सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक भरत रसाळे होते.ही सभा आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे पार पडली.

सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना भरत रसाळे म्हणाले की संस्थेच्या सभासदांसाठी कमी गुंतवणीत जास्त फायदा मिळवून देणारी एक नाविन्यपूर्ण अशी मयत सभासद कुटुंब कल्याण योजना संस्थेच्या वतीने जाहीर करीत आहोत .या योजनेमध्ये प्रत्येक सभासदांने दरमहा रुपये २,०००/- पाच वर्षे जमा करण्याचे आहेत . पाच वर्षांनंतर मयत सभासद कुटुंब ठेव म्हणून त्यांच्या नांवावर रू.१,२०,०००/-जमा होतील. एखाद्या सभासदाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास सभासदांच्या जमा ठेवीच्या २० पट म्हणजे रुपये २४ लाख त्या सभासदास मिळणार आहेत व संस्थेच्या मयत सभासद कुटुंब कल्याण निधीतील रुपये ११ लाख असे एकूण ३५ लाख रुपये मयत सभासदांच्या कर्ज खात्यास जमा होणार आहेत कर्ज नसल्यास त्या सभासदाच्या वारसांना २० पट रक्कम मिळणार आहे . संस्थेच्या संचालक मंडळाने तयार केलेल्या या अभ्यासपूर्वक योजनेस सर्व सभासदांनी एक मुखी मंजुरी दिली.

       या योजनेचे स्वरूप व नियमावली संस्थेचे व्यवस्थापक श्री सदाशिव साळवी यांनी वाचून दाखवली या योजनेच्या संदर्भातील चर्चेमध्ये संस्थापक व तज्ञ संचालक भरत रसाळे , चेअरमन शिवाजी भोसले ,सचिव श्री. शिवाजी सोनाळकर, संचालक मच्छिंद्र नाळे ,संतोष आयरे, राजेंद्र कोरे , सात्ताप्पा कासार सभासद सर्वश्री पी वाय पाटील , गोरख वातकर, आनंदा हराळे, टी. आर. पाटील, राजाराम हुल्ले ,सागर पाटील, अनिल सरक, किरण खटावकर , विश्वास केसरकर व व्यवस्थापक सदाशिव साळवी यांनी सहभाग घेतला.
या सभेमध्ये सहकार विभागाचे अधिकारी श्री मिलिंद ओतारी यांनी सभासदांना सहकारी संस्थाच्या मूलभूत नियमांच्या माहितीचे प्रशिक्षण दिले . यावेळी सहकार विभागाचे अधिक्षक निलेश पाटील हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी सोनाळकर यांनी केले आभार संचालक श्री साताप्पा कासार यांनी मांडले.
या सभेसाठी व्हा .चेअरमन माधुरी घाटगे,संचालक सर्वस्वी सूर्यकांत बरगे, मच्छिंद्र नाळे, सर्जेराव नाईक, कृष्णात चौगुले, वसंत पाटील, अमित परीट , राजेश कोंडेकर, सौ.रोहिणी येडगे सल्लागार समिती सदस्य सर्वस्वी संभाजी सुतार, पंडित मस्कर, दशरथ कांबळे, आप्पासाहेब वागरे, चंद्रकांत वाकरेकर, सौ विद्या पाटील, यांच्यासहअसंख्य सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

(फोटो ओळी-खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या विशेष सभेत बोलताना चेअरमन शिवाजी भोसले, सोबत संस्थापक भरत रसाळे, व्हा.चेअरमन सौ माधुरी घाटगे व सर्व संचालक मंडळ सल्लागार समिती सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!