सरनोबतवाडी च्या उपसरपंचपदी प्रमोद कांबळे
सरनोबतवाडी च्या उपसरपंचपदी प्रमोद कांबळे
उजळाईवाडी/प्रतिनिधी
सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रमोद शिवाजीराव कांबळे-केनवडेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच शुभांगी किरण आडसूळ होत्या. वैशाली माळी यांनी राजीनामा दिल्याने निवड प्रक्रिया करण्यात आली.
प्रमोद कांबळे हे कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे पश्चिम ग्रामीण चे सरचिटणीस व सरनोबतवाडी प्रभाग ४ मधून बहुमताने निवडून आले आहेत.त्यांच्या बिनविरोध निवडीने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीसाठी किरण आडसूळ,दीपक आडसूळ यांचे सहकार्य लाभले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदा आडसूळ, गीता आडसूळ,
विजया कांबळे, अपर्णा स्वामी, योगिता आडसूळ, दिपक आडसूळ, संग्राम गजबर, अक्षय कोरे, बाळकृष्ण खोत तसेच ग्रामसेवक दीपा यादव उपस्थित होत्या.










