March 14, 2026

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रोहिणी देवबाला ‘सुवर्ण”

0
IMG-20240718-WA0048(2)

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रोहिणी देवबाला ‘सुवर्ण”

कोल्हापूर/मारुती फाळके

थायलंड येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोलीची ‘एनआयएस’ कुस्ती आखाड्यातील मल्ल रोहिणी खानू देवबा हिने ३३ किलो वजन गटातून सुवर्णपदकाची कमाई करत घवघवीत यश संपादन केले. १५ वर्षांखालील वयोगटात तिने सदर यश संपादन केले आहे.

रोहिणीने पहिल्या फेरीत जपानच्या प्रतिस्पर्धी मल्लाविरुद्ध विजय मिळवत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर कझाकिस्तान व मंगोलियाविरुद्ध लढतीतदेखील आपला धडाका कायम राखत अंतिम फेरीत धडक मारली.

अंतिम फेरीत तिने उझबेकच्या प्रतिस्पर्धीला नमवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी झालेल्या भारतीय कुस्ती संघाच्या निवड चाचणीमध्ये गटातून प्रथम क्रमांक मिळवत रोहिणीने या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. या स्पर्धेसाठी तिला धनंजय महाडिक यांनीही आर्थिक सहाय्य केले.

मूळ पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील रोहिणी देवबा ही अतिशय गरीब घराण्यातील मल्ल असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही तिने कुस्तीमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले. दोनवडे केंद्राचे कोच संदीप पाटील हे तिला मार्गदर्शन करीत आहेत. रोहिणीला दोनवडे केंद्राचे संस्थापक वस्ताद हरी पाटील, संजय जाधव, वस्ताद रावसो इंगवले यांचे सहकार्य मिळत आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!