बहुजनांची लेकरं घडवणाऱ्या पुष्पा गायकवाड यांना राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार
बहुजनांची लेकरं घडवणाऱ्या पुष्पा गायकवाड यांना राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार
समाजासाठी समर्पण भावनेने केलेल्या कार्याचे फळ
कोल्हापूर/मारुती फाळके
वर्षातील ३६५ दिवस मुलांच्या गराड्यात राहून तन मन धन अर्पून अव्याहत अध्यापन…कोणता सण -वार,उत्सव,रजा सवलत नाही,टेंबलाईवाडी सारख्या सर्वसामान्य वस्तीत बहुजनांची लेकरं घडवत शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत तब्बल २५ तर जिल्हा गुणवत्ता यादीत ७३ असे ९८ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा डंका महाराष्ट्रात गाजवला…समाजासाठी निरंतर कष्ट,चिकाटी,सकाळी ७ पासून ते संध्याकाळी ७ पर्यंत मुलांच्या गुणवत्तेचा ध्यास घेणाऱ्या…सतत शाळा..विद्यार्थी.. शिक्षण.. समाज यांच्याबद्दल चिंतनशील असणाऱ्या व सध्या मनपा. श्रीम. लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर कोल्हापूर या शाळेतील गुणी आणि वर्धिष्णू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पुष्पा सुभाष गायकवाड यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला.
मुळात कोणता सन्मान मिळवण्यासाठी हे काम नाहीच,तर आपल्या कर्तव्याशी इमान राखत सर्वसामान्य, बहुजन समाजात गुणवत्तेची खाण आहे. उद्याचं भविष्य असणाऱ्या असंख्य सामान्य परिस्थिती असणाऱ्या लेकरांच्यात प्राविण्य आहे,कॉन्व्हेंट, सी बी एस ई, आय सी एस ई,ग्लोबल शाळांच्या स्पर्धेत अनेक उच्चपदस्थ अधिकारी, आदर्श व्यक्ती घडवणाऱ्या मनपा, जि प च्या शाळा कुठे कमी नाहीत.या शासनाच्या शाळा सुद्धा गुणवत्तेत अग्रभागी आहेत हेच या निकालावरून अधोरेखित होण्यासाठी केलेले प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कष्ट आणि समर्पण आहे.
ज्या शाळेत बदली होईल तिथेच मुलांच्या सहवासात राहणे.शाळा,गुणवत्ता,नवोपक्रम,विद्यार्थीविकास,समाजउन्नती हाच गायकवाड मॅडम यांचा जीवनक्रम.
शिष्यवृत्ती परीक्षा या भविष्यातील स्पर्धा परीक्षाचा पाया. अधिकारी घडवण्याचे बीज च गायकवाड मॅडम यांनी मनपा च्या शाळेत रुजवले आहे.गायकवाड यांच्या राज्य पुरस्काराने कोल्हापूर महानगरपालिका शाळांच्या शिरपेचात आणखी मानाचा सन्मानबिंदू निर्माण झाला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमधील सहायक शिक्षिका पुष्पा सुभाष गायकवाड यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने मनपा शाळांची आणि गुरुजनांची मान अभिमानाने उंचावली आहे. कामसू आणि उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. टेंबलाईवाडी विद्यालय येथे कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.
वर्धन धनाजी माळी हा त्यांचा विद्यार्थी २०१७ साली टेंबलाईवाडी विद्यालयातून राज्यात प्रथम आला होता. त्यानंतर माध्यमांनी शाळेची जोरदार प्रसिद्धी केल्याने व दरवर्षी शिष्यवृत्तीचा आलेख चढता राहिल्याने टेंबलाईवाडी शाळेच्या पटसंखेत ६०० पासून १२०० पर्यंत वाढ झाली. २०२२ ला त्यांचे टेंबलाईवाडी विद्यालयातून एकूण २४ विद्यार्थी एकाच वेळी गुणवत्ता यादीत आले होते.
विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्या परिचित आहेत. त्या बीए, एमए. डीएड, बीएडधारक आहेत. महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदिरात त्या बारा वर्षे कार्यरत होत्या.२०२२ पासून जरगनगर विद्यामंदिर येथे कार्यरत आहेत. आहेत.२०२३ मध्ये जरगनगर विद्यामंदिरात एकाच वर्षी ६४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणून दाखविले.नवोपक्रम स्पर्धत कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा पहिला क्रमांक होता. नवोपक्रम राज्यस्तरासाठी पात्र ठरलेल्या शिक्षिका आहेत.त्या उत्तम लेखन करतात. कविता करतात. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला आहे. आपला वर्ग शंभर टक्के प्रगत करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.राज्याच्या दीक्षा अँप साठी इ कंटेंट निर्मिती मध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
गायकवाड मॅडम यांनी आजवरच्या सेवेत जाईल त्या शाळेत सोने केले आहे.स्वतःला सेवेतील वरिष्ठ वर्गाला अध्यापन करण्याचे विषयशिक्षक प्रमोशन आले असताना स्वतःच्या पदोन्नती ची संधी डावलून केवळ विद्यार्थ्यांची १ ली ते ५ वी ची तयारी करण्या साठी व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चे आपले ज्ञान मिळणार नाही या भावनेपोटी त्यांनी स्वतःची पदोन्नती नाकारली. आजवर निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले आहे
स्पर्धा परीक्षेचे अध्यापन करण्यात त्यांचा हातखंडा असून आजपर्यंत त्यांचे असंख्य विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय, सातारा सैनिक स्कूल अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये चमकले आहेत.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत दीक्षा ॲप साठी ई कंटेंट क्रियेटर म्हणून त्यांनी काम केले आहे.
त्यांनी नवोपक्रम स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे व त्यांचा नवोपक्रम राज्यस्तरासाठी पात्र ठरला होता. हैदराबाद अभ्यास दौरा, इसरो अभ्यास दौरा यासाठी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्या स्वतः उत्तम लेखिका कवयित्री आहेत.
आपला वर्ग नेहमी शंभर टक्के प्रगत करणाऱ्या आपल्या, विद्यार्थ्यांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून तन-मन – धन अर्पून सौ. पुष्पा सुभाष गायकवाड या खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री आहेत.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे २०२३-२४ या वर्षासाठीचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची सोमवारी (दोन सप्टेंबर रोजी) घोषणा करण्यात आली. आणि हा पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी तळमळीने राबणाऱ्या पुष्पा सुभाष गायकवाड या समाज शिक्षिकेला जाहीर होताच कोल्हापूरात सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट
‘प्रमोशन’ ची संधी डावलली—————————-
गायकवाड मॅडम यांनी आजवरच्या सेवेत जाईल त्या शाळेत सोने केले आहे.स्वतःला सेवेतील वरिष्ठ वर्गाला अध्यापन करण्याचे विषयशिक्षक प्रमोशन आले असताना स्वतःच्या पदोन्नती ची संधी डावलून केवळ विद्यार्थ्यांची १ ली ते ५ वी ची तयारी करण्या साठी व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चे आपले ज्ञान मिळणार नाही या भावनेपोटी त्यांनी स्वतःची पदोन्नती नाकारली. आजवर निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले आहे.
चौकट-
हा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांचा—————————
हा पुरस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना अर्पण करते.आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कार्याला यश मिळाले. आतापर्यंत शिष्यवृत्ती मध्ये ९८ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. राज्यात प्रथम क्रमांकासह अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत दैदीप्यमान यश मिळवलेले आहे. माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नीता ठोंबरे मॅडम, टेंबलाईवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पिंगळे तसेच जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माजीं प्रशासनाधिकारी शंकर यादव, प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे, कोल्हापूर डाएटचे प्राचार्य भोई, ज्येष्ठ अधिव्याख्याता अंजली रसाळ, रमेश, समरजीत पाटील या सर्वांचे सातत्याने प्रेरणा मिळाली.हा पुरस्कार माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे.त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी जगातला परमोच्च आनंद आहे.
या वर्षी १०० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्यासाठी अविरत परिश्रम घेणार आहे.
—
सौ.पुष्पा सुभाष गायकवाड
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त.










