सागर बगाडे, विवेक चांदलिया राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांंनी सन्मानित
कोल्हापूर/प्रतिनिधी:
शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच आयटीआयमधील कौशल्य विषयक कार्यक्रमावरुनही आयटीआय निदेशकाला सन्मानित करण्यात आले.
यामध्ये शालेय विभागात कोल्हापूरच्या स. म. लोहिया ह हायस्मेल अँड ज्युनिअर कॅलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बगाडे,गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके, उच्च शिक्षण विभागात पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्रा. प्रा.डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसइआर पुणे संस्थेतील प्रा. श्रीनिवास होथा तसेच भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत कोल्हापूर जिल्हयातील आयटीआय निदेशक विवेक चांदलिया या शिक्षकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, श्रीमती सुकन्या मुजुमदार यासह वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त सागर बगाडे या उपक्रमशील शिक्षक यांना २०२४ वर्षाचा शालेय शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या तीस वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निर्देशक विवेक चिमन चांदलिया यांना हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशकांसाठीचा २०२४ मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पेंर्टिग आणि स्प्रे चित्रकला या कला क्षेत्रात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.










