March 24, 2026

शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेची सभा खेळीमेळीत

0
IMG-20240908-WA0034(1)

शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेची सभा खेळीमेळीत संपन्न.

भेडसगाव/मारुती फाळके

अल्पावधीत शिक्षक – शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वासार्ह कारभाराचा आदर्श निर्माण केलेली शाहूवाडी तालुक्यातील गृहतारण सहकार संस्थेतील शिखर संस्था शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सर्वसाधारण सभा आनंद मंगल कार्यालय सरूड,ता.शाहूवाडी येथे संपन्न झाली.

सुरुवातीला प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय पाटील यांनी केले.
संस्थेचे चेअरमन आनंदराव हारुगडे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
संस्थेला यावर्षी १६,१९,४७४/- रुपये इतका नफा झाला असून सभासदांना ११% डिव्हिडंड रोख वाटप केले व दीपावली भेटवस्तू वाटपासाठी तरतूद रूपाने १२% असा एकत्रित २३% डिव्हिडंड वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे चेअरमन आनंदराव हारुगडे यांनी जाहीर केले.

यावेळी आयोजित गुणवंतांच्या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित,पंचायत समिती शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारीसो मा.विश्वास सुतार साहेब,व शिक्षणविस्तारधिकारीसो मा.आनंदराव सुतार साहेब,यांनी उपस्थितांना आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा, गुणवंत विद्यार्थी,राज्य,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सुरवातीला कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे-पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले तर संस्थेचे संस्थापक हेमंत भालेकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा लेखा जोखा मानला.

सभेस भानुदास माने,प्रकाश पाटील(सोनवडेकर),दिलीप भोसले,संजीवनी सुर्वे,जयश्री कुंभार,क्षमा जाधव,कमल दिंडे,जयश्री मगदूम,कलावती येळवनकर,सर्व शाखांचे संचालक मंडळ तसेच सल्लागार मंडळ,सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विजयकुमार गावडे यांनी केले आभार संचालक किरण शिंदे यांनी मानले.

(फोटो ओळी- शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दीपप्रज्वलन करताना शाहूवाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, सोबत शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे, हेमंत भालेकर,आनंदा हारुगडे,संजय पाटील,विक्रम पोतदार,शिवाजी पाटील,चंद्रकांत पाटील,भानुदास माने, व सर्व संचालक मंडळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!