March 24, 2026

यशवंत शिक्षक पतसंस्थेला १७ लाखाचा नफा-विक्रम पोतदार

0
IMG-20240908-WA0040(1)

यशवंत शिक्षक पतसंस्थेला १७ लाखाचा नफा- चेअरमन विक्रम पोतदार

४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

भेडसगाव/मारुती फाळके
शाहूवाडी तालुक्यातील सर्वात जुनी शिक्षक सहकार संस्था असलेली
शाहूवाडी तालुका यशवंत प्राथमिक शिक्षक पतसंस्थेस या आर्थिक वर्षात १७ लाख रुपये नफा झाल्याचे संस्थेचे चेअरमन विक्रम पोतदार यांनी सांगितले, ते
पतसंस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.सभा आनंद मंगल कार्यालय सरूड,ता.शाहूवाडी येथे खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

प्रारंभी संस्थेचे चेअरमन विक्रम पोतदार यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
संस्थेला यावर्षी ११,७५,५४७/- रुपये इतका नफा झाला असून सभासदांना १४ % डिव्हिडंड रोख वाटप केले व दीपावली भेटवस्तू वाटपासाठी तरतूद केलेली १०% असा एकत्रित २४% डिव्हिडंड वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे चेअरमन विक्रम पोतदार यांनी जाहीर केले.

दरम्यान सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेत संजय तळप,संजय जगताप,सदाशिव कांबळे,किरण शिंदे,शरद पाटील,संभाजी साठे,अरुण पाटील यांनी सहभाग घेतला.
सभेत आयोजित सभासदांच्या गुणवंत पाल्य,सेवानिवृत्त शिक्षक,स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे पंचायत समिती शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारीसो मा.विश्वास सुतार व शिक्षणविस्तारधिकारीसो आनंदराव सुतार यांच्या हस्ते संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा, गुणवंत विद्यार्थी,राज्य,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे-पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. तर हेमंत भालेकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मानला.

यावेळी केंद्रप्रमुख तथा संचालक बी बी कोंडावळे,चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील(शिंपे),संजय आपटे,रघुनाथ शेळके,अनिल म्हाऊटकर,सुनील पाटील,सुनील सुतार,तौसिफ पटेल,राजाराम पाटील,शोभा पाटील,सुवर्णा यादव,सर्व सल्लागार मंडळ,सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार गावडे यांनी केले आभार संस्थेचे व्हा. चेअरमन यशवंत पारळे यांनी मानले.

फोटो ओळी- सरूड ता.शाहूवाडी येथे यशवंत शिक्षक पतसंस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षक नेते, शिक्षक बँक संचालक शिवाजी रोडे,हेमंत भालेकर, संस्थेचे चेअरमन विक्रम पोतदार, व्हा.चेअरमन यशवंत पारळे,संचालक सदाभाऊ कांबळे, संजय जगताप,बी बी कोंडावळे,चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील(शिंपे),संजय आपटे,रघुनाथ शेळके,अनिल म्हाऊटकर,सुनील पाटील,सुनील सुतार,तौसिफ पटेल,राजाराम पाटील,शोभा पाटील,सुवर्णा यादव आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!