अभुतपूर्व उत्साहात ‘केंद्रशाळा पट्टणकोडोली’चे स्नेहसंमेलन संपन्न
अभुतपूर्व उत्साहात केंद्रशाळा पट्टणकोडोली चे स्नेहसंमेलन संपन्न
विद्यार्थ्यांचा नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
कोल्हापूर/मारुती फाळके
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळा पट्टणकोडोली शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ “सृजनाविष्कार सोहळा” उत्साहात संपन्न झाला. स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पट्टणकोडोली गावच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री कोळी,प्रमुख उपस्थित कामान्ना धनगर, शरद पुजारी,केंद्रप्रमुख भूपाल मंडगे,मुख्याध्यापक राजेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
केंद्रीय प्राथमिक शाळा पट्टणकोडोली ही दीडशे वर्षाची समृद्ध परंपरा असणारी जिल्ह्यातील नामांकित शाळा असून या शाळेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. या शाळेतून घडलेले विद्यार्थी आज देशाच्या आणि देशाच्या बाहेर आपला नावलौकिक करत आहेत.शाळेच्या स्थापनेला १५४ वर्ष पूर्ण होत असून शाळेने १५५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय प्राथमिक शाळा पट्टणकोडोलीच्या वतीने विद्यार्थ्यांचा “विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण” सोहळा संपन्न झाला.
उद्घाटनाच्या सत्रामध्ये केंद्र व तालुका स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडा,सांस्कृतिक व विज्ञान प्रदर्शन स्पर्धात धवल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अर्पण कांबळे,बिरदेव देवबा, कृष्णात शिरोळे,श्रेयश गायकवाड तसेच समूहगीत लहान गट-विजेता संघ, -खो खो उपविजेता संघ-मोठा गट अशा सांघिक व वैयक्तिक खेळातील स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दरम्यान झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गणेशवंदना, बुम बुम, बचना ए हसीनो, लुंगी डान्स, गौतम बुद्ध- बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा संदेश देणारे गीत, धनगरी नृत्य, मावळ जागं झालं र, कोळी नृत्य, गोंधळ, नखरेवाली, बैलगाडा, शेतकरी नृत्य, देशभक्तीपर ,फनी डान्स,लूटपुट, रघुपती राघव राजाराम, पुष्पा कॉकटेल, सामाजिक संदेश देणाऱ्या वृक्षसंवर्धन, पुष्पा तमिळ सॉंग, जुबी डुबी, एज्युकेशनल थीम, ज्योतिबा मल्हार अशा विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी अदाकारी करत सुंदर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या नृत्याविष्कारास आर्थिक बक्षीसांच्या रूपाने प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे मान्यवरांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी गावातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका भारती वनकोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कामाना धनगर, उपाध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सदस्य शरद पुजारी, शिक्षणतज्ञ सिद्धराम भानसे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन पांढरे, शीला पुजारी, गौरवा कांबळे, शकुंतला दाभाडे,मनीषा हुपरे यासह केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,रसिक श्रोते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत केंद्रशाळा पट्टणकोडोलीचे मुख्याध्यापक राजेश पाटील, सूत्रसंचालन मारुती फाळके चंद्रभागा देशमुख तर आभार मिनाज मुजावर यांनी मानले.
चौकट-१
देशभक्तीपर गीताने रसिक गहिवरले
देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांसाठी कृतज्ञता भावना व्यक्त करत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी आर्मी सॉंग सादर केले.
देशभक्तीच्या जाज्वल्य देशप्रेमावरती आधारित कॉकटेल आर्मी सॉंग सादर केले.या गाण्याच्या सादरीकरणाने रसिक भावुक झाले.गाण्यातील सैनिकांच्या समर्पण बलिदानाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.कार्यक्रमातील सर्वच गाण्यास प्रेक्षकांची दाद मिळाली. तसेच प्रत्येक सादरीकरणास टाळ्यांचा कडकडाट झाला.
चौकट-२ यशस्वी संयोजन टीम
शाळेतील सहकारी शिक्षक मिनाज मुजावर,प्रकाश कांबळे,विकास माळगे,मारुती फाळके,चंद्रभागा देशमुख,संगीता कोळी,दिपाली कोळी तसेच नृत्य दिग्दर्शक कौस्तुभ कोठावळे, निखिल बनसोडे व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.
या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रावसाहेब माने,संजय मोरे,अनिल पोवार,संगीता माने,शशिकांत खांडेकर,सुहास कदम, प्रवीण वैद्य, नंदकुमार पिराई,सोमनाथ कामान्ना,खानु देवबा, बाळगोंडा शिरोळे,बाळासो कांबळे, सुकुमार गायकवाड आदींसह पालक,ग्रामस्थ,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो ओळी)-
१.केंद्रशाळा पट्टणकोडोली च्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन करताना गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री कोळी, भारती वनकोरे, शरद पुजारी, कामाना धनगर, सिद्राम भानसे,सचिन पांढरे,शीला पुजारी, गौरव्वा कांबळे, मनीषा हुपरे,शंकूतला दाभाडे,पालक,शिक्षक आदी.
२.सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याविष्कार सादर करताना
केंद्रशाळा पट्टणकोडोली चे विद्यार्थी.










