जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत ‘करवीरकर’ चॅम्पियन,द्वितीय चंदगड तर तृतीय राधानगरी
जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत ‘करवीरकर’ चॅम्पियन, द्वितीय चंदगड तर तृतीय क्रमांक राधानगरी
जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत शिक्षक केडर चा समावेश- शिक्षणाधिकारी मीना शेंडकर
कोल्हापूर/मारुती फाळके:
जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद करवीर तालुक्याने पटकावले असून द्वितीय चंदगड व तृतीय क्रमांक राधानगरी तालुक्याने पटकावला आहे. कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे २ दिवस या स्पर्धा रंगल्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचा निकाल –
लहान गट
कथाकथन:
प्रथम क्रमांक-आराध्या भुसारी, शाहूवाडी
द्वितीय क्रमांक- शौर्य पाटील,वाळोली पन्हाळा
तृतीय क्रमांक- साक्षदा माळकर,शिरोळ
प्रश्नमंजुषा –
प्रथम क्रमांक -केंद्रशाळा,कणेरी करवीर,
द्वितीय क्रमांक- केंद्रशाळा कौलव,राधानगरी
तृतीय क्रमांक- खानापूर,भुदरगड
समूहगीत-: प्रथम क्रमांक – विद्या मंदिर म्हालसवडे ,करवीर
द्वितीय क्रमांक-कोनोली तर्फ असंडोली,राधानगरी
तृतीय क्रमांक- स्वामी विवेकानंद वि. म.आजरा
नाट्यीकरण: वि. म.पडळी, राधानगरी
द्वितीय क्रमांक- वि. म.मांडेदुर्ग चंदगड
तृतीय क्रमांक- वि. म.हसुरवाडी, गडहिंग्लज
समूहनृत्य : प्रथम क्रमांक -शिनोळी बुद्रुक,चंदगड
द्वितीय क्रमांक- वि. म.दानेवाडी(पन्हाळा)
तृतीय क्रमांक-वि. म.होनेवाडी(आजरा)
मोठा गट-
समूहगीत – प्रथम क्रमांक विद्यामंदिर एरंडपे,ता.भुदरगड
द्वितीय – विद्यामंदिर मडीलगे ता. आजरा
तृतीय क्रमांक-विद्यामंदिर म्हालसवडे ता. करवीर
समूहनृत्य :
प्रथम क्रमांक- विद्यामंदिर लिंगणुर दुमाला ता.कागल
द्वितीय- विद्या मंदिर बसरगे ता.चंदगड,
तृतीय क्रमांक- विद्या मंदिर पनोरे ता. पन्हाळा
नाट्यीकरण : प्रथम क्रमांक-विद्या मंदिर सुंडी ता. चंदगड द्वितीय क्रमांक-विद्या मंदिर हसुरवाडी ता. गडहिंग्लज,
तृतीय क्रमांक- विद्या मंदिर कावणे ता. करवीर
कथाकथन:
प्रथम-
शुभ्रा कदम,आवळी पन्हाळा द्वितीय- श्रेया वीर विद्या मंदिर चांदे राधानगरी
तृतीय – श्रेया ढोकरे बनकर विद्या मंदिर पिंपळगाव ता.भुदरगड
प्रश्नमंजुषा : प्रथम विद्या मंदिर येवती ता. करवीर,
द्वितीय -विद्यामंदिर लिंगणुर कसबा नुल ता. गडहिंग्लज,
तृतीय विद्या मंदिर अणदूर ता. गगनबावडा
विजेत्या स्पर्धक व संघांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एम. आय. सुतार,उपशिक्षणाधिकारी बी डी टोणपे,आर व्ही कांबळे, रवींद्र ठोकळ,गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार, आनंदराव आकुर्डेकर,शिवाजी मानकर,समग्र शिक्षा अभियानाच्या समन्वयक आम्रपाली देवेकर,विद्या वर्मा, शिक्षक संघटना प्रतिनिधी जनार्दन नेऊगंरे,प्रमोद तौनदकर,शिक्षक बँकेचे संचालक पदमजा मेढे,गजानन कांबळे उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा परिक्षक म्हणून महेश हिरेमठ, स्नेहल कुंभार, प्रभाकर लोखंडे, सरिता सुतार,परशराम आंबी,करपे सर,संयोगीता महाजन,ढाले मॅडम, चरणकर मॅडम आदींनी काम पाहिले.यावेळी संयोजन कमिटी तील रवींद्र सुर्वे, दिलीप चव्हाण, विजय गारे, दीपक जगदाळे यांनी परिश्रम घेतले.
बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन संदीप मगदूम, सविता कुंभार यांनी तर आभार रवींद्र सुर्वे यांनी मानले.
चौकट-
जि.प. च्या सांस्कृतिक स्पर्धेत ‘शिक्षक’ केडर चा समावेश- मीना शेंडकर
प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी बक्षीस वितरण समारंभात शिक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली. त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ज्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये ‘शिक्षक केडर ‘ चा समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असून सोलो डान्स, सोलो सॉंग, ग्रुप डान्स, डू इट सॉंग या चार सांस्कृतिक प्रकारात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना यापुढे सहभागी होण्याची संधी मिळेल. गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षकांना या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घेण्याची शिक्षक संघटनाची मागणी होती. मीना शेंडकर यांच्या कार्यकाळात ही मागणी पूर्ण झाल्याचे बोलून दाखवल्यानंतर शिक्षकांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
(फोटो ओळी–सांस्कृतिक स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद प्रथम क्रमांकाचा सन्मान स्वीकारताना करवीर तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक.)










