May 14, 2026

असर अहवाल सरकारी शाळांची प्रतिमा मलीन करणारा- प्रमोद तौंदकर

0
IMG-20250130-WA0028

असर अहवाल सरकारी शाळांची प्रतिमा मलीन करणारा- प्रमोद तौंदकर

कोल्हापूर/प्रतिनिधी

शिक्षणाच्या सद्यस्थितीबाबत प्रथम या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केलेला असर अहवाल हा अशास्त्रीय आणि अपुऱ्या सर्वेक्षणावर आधारित असून यामुळे बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दर्जेदार काम करणाऱ्या सरकारी शाळांची प्रतिमा मलिन होत आहे केवळ दोन टक्के गावांतून आणि अर्धा टक्का विद्यार्थ्यांचा सर्वे शालेय वेळेनंतर केल्यास शिक्षणाचे खरे चित्र कधीही समोर येणार नाही असे प्रतिपादन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकांनी मिळून असर अहवालाची होळी केली व कठोर निषेध नोंदवला.

यावेळी बोलताना शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष विक्रम वागरे म्हणाले की प्रथम या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केलेला ‘असर’ अहवाल शिक्षणाची वास्तविक स्थिती न दाखवता भ्रम निर्माण करतो आहे. त्यामुळे सरकारी शाळांची बदनामी होत असून शिक्षणाशी संबंध नसणाऱ्या लोकांकडून केला जाणारा हा अहवाल आम्ही नाकारत आहोत. NAS, SLAS हे सर्वे अद्याप प्रसिद्ध व्हायचे असून ते अधिकृत असल्याने त्यातून शाळांचे व शिक्षणाचे खरे स्वरूप सामोरे येईल. त्यानुसार आम्ही आमच्या कामात सुधारणा करू.

यावेळी शिक्षक समितीचे सरचिटणीस विकास पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पोवार, प्रसिद्धीप्रमुख प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, कोषाध्यक्ष संतोष पाटील, उत्तम फराकटे, मारुती पाटील, युवराज गायकवाड, संदीप वाली, संतोष टेपुगडे, बंडेराव पाटील, सचिन देसाई, सदाशिव अस्वले, राजाराम ऱ्हायकर, साऊताई पाडळकर, प्रतिभा पाटील यांसह अनेक शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!