March 24, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत कास्ट्राईब संघटनेची विविध प्रश्नावर चर्चा

0
IMG-20250201-WA0025

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत कास्ट्राईब संघटनेची विविध प्रश्नावर चर्चा

शिक्षकांच्या प्रश्नाच्या लवकरच निपटारा- एस.कार्तिकेयन

कोल्हापूर/प्रतिनिधी

पदोन्नतीतील आरक्षण, गोपनीय अभिलेख, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बजेट, समाजकल्याण शिष्यवृत्ती,मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची वेतन बिले,पदोन्नती या व इतर प्रश्नांच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्यासमवेत कास्ट्राईब संघटनेची विविध प्रश्नावर चर्चा व बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली.

यावेळी संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर खालील प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीतील विषय –
१) भरती मधील अनुशेष या विषयावर सर्व खाते निहाय रिक्त जागा माहिती घेऊन सर्व अनुशेष भरलेला आहे असे सांगण्यात आले.
२) पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर सविस्तर चर्चा होऊन सध्या पदोन्नती बिंदू नामावलीनुसार होत नसून सेवा जेष्ठतेनुसार सर्व पदोन्नती घेतली जाते शासन निर्णयानुसार असे सांगण्यात आले.
३) गोपनीय अभिलेख मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अभिलेख खराब लिहिले जाऊ नये असा शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी केली जाते असे सांगण्यात आले
४) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व येणे – देणे रकमा तात्काळ देण्यात याव्यात याकरिता बजेटची मागणी करण्यात आली आहे ती मिळताच सर्व प्रस्ताव मंजूर झालेले आहेत फक्त बजेट मंजूर होताच रकमा अदा केल्या जातील असे सांगण्यात आले. ५)समाज कल्याण शिष्यवृत्ती जिल्हा परिषदेकडे यापूर्वी सावित्रीबाई दत्तक पालक योजना शिष्यवृत्ती राबविण्यात आली होती त्याचा निधी जिल्हा परिषदेकडे असताना गेली पाच वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही तात्काळ मिळणे संदर्भात खाते प्रमुखास सूचना करण्यात आल्या
६) मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन बिले जाणीवपूर्वक टाळली जातात यावर गांभीर्याने चर्चा होऊन सदर प्रकरणाची चौकशी होऊन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
७) शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबवली जाईल अशी माहिती दिली.

८) बदली प्रकरणांमध्ये अन्यायग्रस्त प्रकरणांची दखल घेऊन त्यांना न्याय दिला जाईल असे सांगितले.

९ ) विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव मंजूर होऊन रक्कम त्यांचे खातेवर जमा केली जाते परंतु अकाउंटच्या चुकीमुळे असे शिष्यवृत्ती जमा होऊ शकलेली नाही अशा प्रकरणांची माहिती संघटनेस देणे संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

१० )संघटनेच्या कार्यालयासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती देण्यात आली. ऐनवेळच्या विषयावरती चर्चा होऊन सहविचार सभा अतिशय खेळी मिळत संपन्न झाली.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे प्रशासक,अत्यंत संवेदनशील मनाचे मुख्यकार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी एक अभिनव मिशन घेऊन कोल्हापूर जिल्हापरिषदे च्या १९५८ प्राथमिक शाळेमध्ये CCTV लावून चिमुकल्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निकालात काढणेसाठी मिशन यशस्वी केलेबद्दल संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

बैठकीस संघटनेचे महासचिव नामदेवराव कांबळे,- राज्यअध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,विभागीय अध्यक्ष संजय कुर्डूकर,जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन,कोषाध्यक्ष पी डी सरदेसाई,उपाध्यक्ष विजय कांबळे चोकाककर, गणपतराव गायकवाड,हातकणंगले तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, डी के कांबळे – अध्यक्ष करवीर , भिमराव तराळ – अध्यक्ष गडहिंग्लज ‘,संघटकसुरेश गुरव व संघटनेचे असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. स्वागत संजय कुर्डुकर,प्रास्ताविक गौतम वर्धन तर आभार विजय कांबळे- चोकाककर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!