धनाजी माळींकडे समृद्ध कथाकाराच्या क्षमता -डाॅ.सुनिलकुमार लवटे
धनाजी माळींकडे समृद्ध कथाकाराच्या क्षमता
-डाॅ.सुनिलकुमार लवटे
कोल्हापूर/मारुती फाळके
धनाजी माळी मराठी साहित्य विश्वात पदार्पणातच आपल्या समृद्ध कथेने दमदार पाऊल टाकत आहेत. त्यांची कथा भविष्यात अनेक मानाचे पुरस्कार पटकावेल असे मत ज्येष्ठ विचारवंत डाॅ.सुनिलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. ते धनाजी माळी लिखित ‘गोष्ट साडे पाच मिलियन डाॅलरची’ या कथा संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. कोल्हापूरच्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे कार्यक्रम पार पडला.
यावेळी समीक्षक डाॅ.रणधीर शिंदे, डाॅ.जी.पी.माळी,कथाकार चंद्रकांत निकाडे,राज्य शासन पुरस्कार विजेते साहित्यिक डाॅ.श्रीकांत पाटील, ग्रामीण कथाकार प्रा.सुरेश आडके, शाहूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार व कोल्हापूरच्या परिसरातील बहुसंख्य साहित्यिक मंडळी उपस्थित होती.
डाॅ.रणधीर शिंदे म्हणाले, ‘धनाजी माळींच्या कथा सामाजिक दृष्टीकोन ठेवतात. शिशु,कुमारांच्या भावना मांडतात. ग्रामीण वास्तव जीवनाचा चांगला परामर्श त्यांच्या कथेत पदोपदी जाणवतो. जुन्या व नव्या ग्राम्य संस्कृतीचे बदल नेमकेपणाने त्यांनी टिपले आहेत.
धनाजी माळी यांनी मनोगतातून स्वतःची जडण-घडण, वाचनाची आवड, सोशल मिडियातील लेखन व कथाकार होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला.
चंद्रकांत निकाडे म्हणाले, ‘लेखकाने कथेत वास्तव मांडताना कथेची तंत्रे सांभाळली आहेत. प्रचंड वाचनातून त्यांची कथा समृद्ध झाली आहे.
डाॅ.श्रीकांत पाटील म्हणाले, ‘मसापच्या वारणा शाखेत सभासद झाल्यापासून माळींची कथा बहरली. त्यांना तिथे उत्तम मार्गदर्शन मिळाले. त्यांची कसदार कथा वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.
कार्यक्रमास शैक्षणिक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, मसाप वारणा शाखा, क्रिएटीव्ह टिचर्स फोरमचे दीपक जगदाळे, संजय कळके, गुलाब अत्तार, उत्तम तलवार, शुभदा सुतार, डॉ. निशा काजवे, जिल्हयातील बहुसंख्य शिक्षक, शैक्षणिक व्यासपीठ मलकापूरचे संस्थापक अध्यक्ष विनायक हिरवे, पोहाळेतील कृषी भूषण सीताराम चौगुले, पत्रकार निवास मोटे, अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक संजय चौगुले वतनदार, केंद्रप्रमुख संजय गांगण, शहाजी पाटील, प्रकाश एडगे, शिक्षण प्रेमी विनायक हावळ, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष कृष्णात रेवडे, उपाध्यक्ष गणेश नागटिळक, तेजराज पाटील, शरद पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास शैक्षणिक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, मसाप वारणा शाखा, क्रिएटीव्ह टिचर्स फोरमचे शिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कथाकार प्रा.सुरेश आडके यांनी केले. सुत्रसंचालन सौ. साधना माळी यांनी, तर आभार भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री कासोटे यांनी मांडले.










