जुनी पेंशन संघटने’मार्फत आजपासून हातकणंगले तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धेचे आयोजन
जुनी पेंशन संघटने’मार्फत आज व उद्या दोन दिवसीय हातकणंगले तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धेचे आयोजन
हातकणंगले तालुक्यातील शिक्षकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे- बालाजी पांढरे
कोल्हापूर/मारुती फाळके :
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा हातकणंगले यांच्या विद्यमाने हातकणंगले तालुक्यातील शिक्षकांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन आज १५ फेब्रुवारी व १६ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय सन्मती विद्यालय तारदाळ ता.हातकणंगले येथे या स्पर्धा होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,राजकुमार शेटे,सुशांत भंडारे,संगीता कडुकर यांनी दिली.
हातकणंगले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक संघटना अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व हातकणंगले तालुका जुनी पेन्शन संघटना यांच्या नियोजनाने शिक्षिकांसाठी बॅडमिंटन, धावणे, गोळा फेक, थाळी फेक, लिंबू चमचा,गीतगायन,संगीतखुर्ची,बुद्धिबळ, कथाकथन, प्रश्नमंजुषा
या प्रकारात दोन दिवसीय १५ फेब्रुवारी व १६ फेब्रुवारी सन्मती विद्यालय तारदाळ ता.हातकणंगले येथे या स्पर्धा होणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम व खेळाला खुप महत्व आहे. शिक्षकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पूरक खेळ व व्यायामाची गरज आहे. म्हणूनच हातकणंगले तालुक्यातील सर्व शिक्षकांनी दोन दिवसीय या स्पर्धेचा निखळ आनंद लुटावा असे आवाहन हातकणंगले तालुका जुनी पेंशन परिवाराने केले आहे.
सदर स्पर्धेतील सांधिक खेळातील पहिल्या तीन विजेत्यांना चषक, वैयक्तिक खेळातील पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेतील प्रत्येक सहभागी खेळाडू यांना सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र
देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा पूर्णपणे मोफत असतील.
या स्पर्धेसाठी बालाजी पांढरे
जिल्हा कार्याध्यक्ष, संगीता कडूकर
जिल्हा महिला सरचिटणीस,
मारुती फाळके
जिल्हा मीडिया प्रमुख,
अमोल गायकवाड
जिल्हा उपाध्यक्ष, राजकुमार शेटे
सरचिटणीस
(प्रभारी तालुकाध्यक्ष )
सुशांत भंडारे
कार्याध्यक्ष
(प्रभारी कोषाध्यक्ष),
मुजाहिद पटेल
उर्दू प्रतिनिधी,
श्रीम. वैशाली कांबळे
जिल्हा प्रतिनिधी,
सतीश रणशिंगे
जिल्हा प्रतिनिधी यासह
सागर माळी, दत्तात्रय गायकवाड, घनश्याम तराळ, अमित कांबळे, आनंदा घाटगे, पारीसा पाटील, चंद्रकांत कुंभार, दीपक ढोणे, कुमार हेगडे, सागर खोत,सागर पाटील, संतोष कोळी, सुशांत काटे, सद्दाम आत्तार,गोपाळ लोंढे, पल्लवी कोले,सोनाली चव्हाण, संध्या महाजन, स्नेहा पाटील, स्वाती लाटणे यांसह सर्व हातकणंगले तालुका पेंशन संघटना परिवार परिश्रम घेत आहे.
आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा विकासासाठी अविरतपणे राबणाऱ्या, आजच्या तंत्रज्ञान युगात वेगवेगळ्या जबाबदारीत असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना मनसोक्तपणे खेळता यावे म्हणून सदर स्पर्धेचे जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आयोजन केले आहे. याचा लाभ जेष्ठ- तरुण शिक्षक बांधवासह महिला भगिनींनी घ्यावा.
—–
बालाजी पांढरे
जिल्हा कार्याध्यक्ष
जुनी पेंशन संघटना कोल्हापूर










