March 14, 2026

हातकणंगले तालुक्यातील शिक्षकांनी लुटला क्रीडा स्पर्धेचा आनंद!जुनी पेंशन संघटना हातकणंगले मार्फत आयोजन

0
IMG-20250220-WA0017

हातकणंगले तालुक्यातील शिक्षकांनी लुटला क्रीडा स्पर्धेचा आनंद!

हातकणंगले तालुका जुनी पेन्शन संघटनेतर्फे आयोजन

कोल्हापूर/मारुती फाळके

दोन दिवस निखळ आनंदाचा” क्रीडा स्पर्धेतून हातकणंगले तालुक्यातील शिक्षकांनी क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटला.सन्मती विद्यालय तारदाळ येथे १५ व १६ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचे संयोजन हातकणंगले तालुका जुनी पेंशन संघटना परिवाराने केले होते.पुरुष व महिला गटात क्रिकेट,बॅडमिंटन, कॅरम,बुद्धिबळ,कबड्डी, ५० मीटर,१०० मीटर धावणे, थाळीफेक, गोळा फेक, लिंबू चमचा, संगीतखुर्ची, कराओके गीतगायन अशा १८ क्रीडाप्रकारात क्रीडा महोत्सव संपन्न झाला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षक बँकेचे अमर वरुटे,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, कार्यालयीन चिटणीस सनी सुतार,जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके,महिला सरचिटणीस संगीता कडुकर,हातकणंगले तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड, सरचिटणीस राजकुमार शेटे,कार्याध्यक्ष सुशांत भंडारे, शिरोळ तालुकाध्यक्ष संतोष जुगळे,गिरीश प्रभू,प्रशांत राणे,प्रकाश धातूंडे तसेच जुनी पेंशन संघटना हातकणंगले परिवाराच्या उपस्थितीत पार पडले.

दि. १६ व १७ फेब्रुवारी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकासाठी विविध १८ स्पर्धा प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या.

यशस्वी संयोजन टीम
——————————-
सदर स्पर्धेच्या नियोजनामध्ये
जिल्हा कार्याध्यक्ष
बालाजी पांढरे,
जिल्हामहिला सरचिटणीस, संगीता कडुकर,तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड,
सरचिटणीस राजकुमार शेटे,
कार्याध्यक्ष सुशांत भंडारे,
जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके,अमित कांबळे,आनंदा घाटगे,सागर खोत,सागर माळी ,पाटील अमोल गायकवाड चंद्रकांत कुंभार,दत्तात्रय गायकवाड,गोपाळ लोंढे,घनश्याम तराळ ,निळकंठ कसबे,दीपक ढोणे,कुमार हेगडे सर ,सचिन कांबळे,महेश धुळुगडे, गणेश आंधळे,विवेकानंद पांचाळ,स्वाती लाटणे,सोनाली चव्हाण,अर्चना पाटील,स्वाती देसाई,सलमा मुल्ला वैशाली कांबळे. या सर्व टीमने एकजुटीने काम करत स्पर्धा यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
तसेच स्पर्धा नियोजनासाठी काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे,नितीन कमते, जयेंद्र लाटणे, अनिल वीर, अशोक जाधव, राजीव कोरे, उदयकुमार नाईक, दिलीप आरगे, शरद कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेचा एकत्रित निकाल असा-

१.क्रिकेट स्पर्धा निकाल
विजेता
टीम वारणा इलेव्हन
[कॅप्टन नितीन कमते]
उपविजेता
टीम पंचगंगा इलेव्हन
[कॅप्टन अशोक जाधव]

२.कबड्डी स्पर्धा निकाल
विजेता
छत्रपती शिवाजी वॉरियर्स
[कॅप्टन सचिन कांबळे ]
उपविजेता छत्रपती शाहू वॉरियर्स
[कॅप्टन सागर खोत]

*….वैयक्तिक स्पर्धा…..*

धावणे स्पर्धा [पुरुष]
1. श्री नितीन कमते सर
2. श्री उदयकुमार नाईक सर
3. श्री घनश्याम तराळ सर

धावणे स्पर्धा [महिला]
1. सौ अर्चना पाटील मॅडम
2. सौ स्वाती लाटणे मॅडम
3. सौ सोनाली चव्हाण मॅडम

बॅडमिंटन स्पर्धा पुरुष
1. श्री नितीन कमते सर
2. श्री अशोक जाधव सर
3. श्री जयेंद्र लाटणे सर

बॅडमिंटन स्पर्धा [महिला]
1. सौ सोनाली चव्हाण मॅडम
2. सौ स्वाती लाटणे मॅडम
3. सौ रमिला तराळ मॅडम

थाळीफेक स्पर्धा पुरुष
1. श्री जयेंद्र लाटणे सर
2. श्री अशोक जाधव सर
3. श्री आरिफ पटेल सर

थाळीफेक स्पर्धा [महिला]
1. सौ सोनाली चव्हाण मॅडम
2. सौ अनिता कुंभार मॅडम
3. सौ संगीता कडूकर मॅडम

गोळा फेक स्पर्धा [पुरुष]
3. श्री आरिफ पटेल सर
2. श्री महेश धुळुगडे सर
3. श्री सुशांत कांबळे सर

गोळा फेक स्पर्धा [महिला]
1. सौ सोनाली चव्हाण मॅडम
2. सौ अनिता कुंभार मॅडम
3. सौ संगीता कडूकर मॅडम

कॅरम स्पर्धा [पुरुष]
1. श्री सुशांत कांबळे सर
2. श्री कादिर पटेल सर
3. श्री अशोक जाधव सर

कॅरम स्पर्धा [महिला]
1. सौ स्वाती लाटणे मॅडम
2. सौ स्वाती देसाई मॅडम
3. सौ अनिता कुंभार मॅडम

लिंबू चमचा स्पर्धा [महिला]
1. सौ अर्चना पाटील मॅडम
2. सौ सोनाली चव्हाण मॅडम
3. सौ यास्मिन मुल्ला मॅडम

संगीत खुर्ची स्पर्धा [महिला]
1. सौ स्वाती लाटणे मॅडम
2. सौ स्वाती देसाई मॅडम
3. सौ अर्चना पाटील मॅडम

कराओके गीत गायन स्पर्धा
1. श्री रामचंद्र ढेरे सर
2. श्री उदयकुमार नाईक सर
3. श्री शरद कुंभार सर

बुद्धिबळ स्पर्धा
1. श्री अनिल वीर सर
2. श्री गुरुदास बडवे सर
3. श्री शरद कुंभार सर

कथाकथन स्पर्धा
1. सौ रमिला तराळ मॅडम
2. सौ अनिता कुंभार मॅडम
3. श्री शरद कुंभार सर

प्रश्नमंजुषा स्पर्धा
1. श्री शरद कुंभार सर
2. श्री परीसा पाटील सर
3. श्री उदयकुमार नाईक सर
हातकणंगले तालुक्यातील शिक्षक क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी हातकणंगले जुनी पेन्शन संघटनेच्या सर्वच शिलेदारांनी महत्त्वाचे योगदान दिले.

चौकट-१.
नेटक्या नियोजनाचे कौतुक-

नोकरीच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढत आपणही क्रीडा कौशल्याचा आनंद घ्यावा, मन,मेंदू आणि शरीराला ऊर्जा द्यावी.स्व तील कारक कौशल्याचा विकास करावा. “एक दिवस या निखळ आनंदातून आपणही ताजेतवाने व्हावे” या उद्देशातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा हातकणंगले यांच्यातर्फे या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. खरंतर या स्पर्धा जिल्हा परिषद प्रशासनाने आयोजित करणे क्रमप्राप्त आहे.जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित होतात, परंतु याच वर्षी ‘शिक्षक’ केडर ला या स्पर्धेत सहभाग घेण्याचा निर्णय झाला,परंतु सर्व शिक्षकांना याचा लाभ होत नाही,वैयक्तिक शिक्षक केडर च्या स्पर्धा व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
— मंगेश धनवडे
जिल्हाध्यक्ष जुनी पेंशन संघटना

चौकट-२
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या या मागणीची दखल घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागाची या वर्षांपासून संधी दिली आहे.,परंतु सर्व शिक्षक सहभागी होण्याला मर्यादा आहेत.यासाठी जुनी पेंशन संघटना हातकणंगले ने एक पाऊल पुढे टाकत सर्वच पातळीवर नेटके,शिस्तबद्ध नियोजन करून क्रीडा स्पर्धेच्या संयोजनाचा जिल्ह्याला एक आदर्श घालून दिला,इथून पुढे प्रत्येक वर्षी या स्पर्धांचे नियमितपणे आयोजन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे यांनी सांगितले.

(फोटो ओळी-
क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदाचे मानकरी संघास गौरविताना जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षक बँकेचे अमर वरुटे,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके,उपाध्यक्ष संतोष गायकवाड,कार्यालयीन चिटणीस सनी सुतार,महिला सरचिटणीस संगीता कडुकर,हातकणंगले तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड, सरचिटणीस राजकुमार शेटे,कार्याध्यक्ष सुशांत भंडारे, शिरोळ तालुकाध्यक्ष संतोष जुगळे,गिरीश प्रभू,प्रशांत राणे,प्रकाश धातूंडे,सोबत जुनी पेंशन संघटना हातकणंगले परिवार आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!