May 14, 2026

संचमान्यतेच्या अयोग्य धोरणाविरोधात पुरोगामी शिक्षक संघटना तीव्र लढा देणार-प्रसाद पाटील

0
IMG-20250227-WA0061

संचमान्यतेच्या अयोग्य धोरणाविरोधात पुरोगामी शिक्षक संघटना तीव्र लढा देणार- प्रसाद पाटील

चिपळूण येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा पुरोगामीच्या वतीने सत्कार.
====================

कोल्हापूर/मारुती फाळके

महाराष्ट्र शासनाने संचमान्यतेच्या बाबत राबवत असलेल्या अयोग्य धोरणाविरोधात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना तीव्र लढा देणार असून दि.१५ मार्च २०२४ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.

ते चिपळूण येथे संघटनेच्या वतीने नुकत्याच झालेल्या गुणगौरव समारभांत बोलत होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर होते.

पाटील पुढे म्हणाले विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणाबातीत अन्यायकारक धोरण पुरोगामी शिक्षक संघटनेने कधीच सहन केलेले नाही. वेळोवेळी मोर्चे, आंदोलने प्रसंगी न्यायालयीन लढा देवून विद्यार्थी व शिक्षकांना न्याय मिळवून तर दिलेला आहे. तसेच राज्यातील २४ जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात सातत्याने पुरोगामी शिक्षक संघटना अग्रभागी राहिली असून कामाच्या जोरावर अल्पावधीतच संघटनेचा २४ जिल्ह्यात विस्तार झालेला आहे.
दरम्यान संघटनेच्या चिपळूण शाखेच्या वतीने तालुक्यातील नासा-इस्रो सहलीसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेस निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा, मुख्यमंत्री माझीशाळा सुंदर शाळा अभियानमधील यशस्वी शाळांचा व नवनियुक्त शिक्षकांचा संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार, नियोजनबद्ध व दिशादर्शक होता. पुरोगामीचे कार्य आदर्शवत आहे असे गौरवोद्गार आजच्या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांनी काढले. प्राथमिक स्वरूपात विचार मांडलेल्या गुणवंत शिक्षकांनी देखील आजवर असं कार्यक्रम अनुभवायला मिळाला नाही अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत पुरोगामीचे आभार माणले.

कार्यक्रमास संघटनेचे माजी राज्याध्यक्ष विनायक घटे, राज्य कार्याध्यक्ष प्रकाशजी पाध्ये , रत्नागिरी जिल्हा नेते प्रदीप पवार , जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर, रायगड जिल्हाध्यक्ष वसंत मोकल, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के पाटील, जिल्हा मार्गदर्शक के एस पाटील, जिल्हा संघटक संजय गांगण, पन्हाळा अध्यक्ष बाबा रणसिंग, सुरेश साळोखे, सुरेश धुमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिपळूण तालुका अध्यक्ष शशिकांत सकपाळ यांनी केले, सुत्रसंचालन सुरेश साळोखे, तर आभार शशिकांत त्रिभुवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!